शमीवर मॅचफिक्‍सिंगचे आरोप केले नाहीत : हसीन

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर महंमद शमीवर कधीही मॅचफिक्‍सिंगचे आरोप केले नाहीत, असे स्पष्टीकरण पत्नी हसीन जहां हिने आज केले. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना हसीनने आपल्या अनेक विधानांवर स्पष्टीकरण दिले.

हसीन म्हणाली, ""मी शमीवर कधीही फिक्‍सिंगचे आरोप केले नाहीत, मला खेळातील काहीही समजत नाही. मी असे आरोप कसे करू शकते. शमीच या प्रकरणाला मॅच फिक्‍सिंगचे वळण देत आहे. मी आमच्यातील वाद घेऊन न्यायालयात जाऊ इच्छित नव्हते. मात्र ज्या पद्धतीने शमी मला गेल्या दोन वर्षांपासून वागवत आहे, त्या वागणुकीला कंटाळून मला ही पावले उचलावी लागली.''

शमीने माफी मागितल्यास न्यायालयात जाणार नाही, असेही हसीन म्हणाली. लग्नाआधी मुले असल्याची बाब लपविल्याचा आरोप शमीने केला होता, यासंदर्भात हसीन म्हणाली, की ""त्याच्याजवळ बोलण्यासारखे काही नाही, म्हणून तो असे आरोप करीत आहे. मी पोद्दारनगरमध्ये तीन मुलींसह राहात होती. शमीला याबद्दल माहिती होती.''
हसीनने मुलाखतीत विविध गोष्टींवर प्रकाश टाकला. ""गेल्या दोन वर्षांमध्ये मला कोणाचाही पाठिंबा नव्हता. शमीसाठी मी माझे करिअर सोडून दिले. वैवाहिक संबंध टिकविण्यासाठी मनापासून प्रयत्न केले; पण त्याने मला केवळ त्रास दिला. त्याचे बऱ्याच महिलांशी विवाहबाह्य संबंध आहेत,'' असेही हसीन म्हणाली.

Web Title: new delhi news hasin jahan mohammed shami cricket