हनीप्रीतची तपासास मदतीची तयारी

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

शरण येण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली: "डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची मानलेली मुलगी हनीप्रीत इन्सान पोलिस आणि तपास यंत्रणांसाठी एक मोठे गूढ बनत चालले आहे. हनीप्रीतविरोधात देश आणि परदेशात शोध मोहीम राबविली जात असताना तिने आज अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून सर्वांनाच आश्‍चर्यचा धक्का दिला. न्यायालयाने यावर सुनावणी करताना आपला निर्णय राखून ठेवला तसेच तिला शरण येण्यास सांगितले आहे.

हनीप्रीतने पंजाब आणि हरियानातील ड्रग्ज माफियांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा याचिकेमध्ये केला आहे. तपास यंत्रणेने संरक्षण दिल्यास आपण चौकशीला सहकार्य करू असेही तिने म्हटले आहे. हरियाना पोलिसांनी आज हनीप्रीतच्या अटकपूर्व जामिनास विरोध केला. न्यायालयानेही या वेळी तिच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. तुम्ही पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयामध्ये का गेला नाहीत, असा सवाल न्यायालयाने हनीप्रीतला केला आहे. बलात्कार प्रकरणात न्यायालयाने गुरमीत राम रहीमला दोषी ठरविल्यानंतर हनीप्रीत अटकेच्या भीतीने फरार झाली आहे. डेराप्रमुखाच्या अटकेनंतर हिंसाचारास चिथावणी दिल्या प्रकरणी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

तर चौकशीस सहकार्य
हनीप्रीतने काही काळासाठी अटकेपासून बचाव व्हावा म्हणून ही याचिका दाखल केली आहे, हरियाना पोलिसांनी या वेळी हनीप्रीतने दिल्लीतील न्यायालयाऐवजी पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी, असा युक्तिवाद केला. हनीप्रीतच्या जिवाला सध्या धोका असून तिला संरक्षणाची हमी दिली गेल्यास ती चौकशीमध्ये सहकार्य करू शकते, असेही तिच्या वकिलांनी सांगितले.

दिल्लीतील घरावर छापा
दक्षिण दिल्लीतील "ग्रेटर कैलास-2' येथील हनीप्रीतच्या निवासस्थानावर हरियाना पोलिसांनी आज छापा घातला. अटकेच्या उद्देशानेच पोलिसांनी ही कारवाई केली होती; पण हनीप्रीत त्यांच्या हाती लागली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. पंचकुला येथील न्यायालयाने हनीप्रीत, आदित्य आणि पवन इन्सान यांच्याविरोधात वारंट बजावले असून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा आहे. मागील महिनाभरापासून हरियाना पोलिस हनीप्रीतच्या मागावर असून यासाठी नेपाळ, राजस्थान, बिहार आणि हरियानातील अनेक ठिकाणांवर छापे घालण्यात आले.

Web Title: new delhi news honeypreet and court