बालके मृत्यू प्रकरण: राजस्थान सरकारला मानवाधिकार आयोगाची नोटीस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

चार आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले

नवी दिल्ली  : राजस्थानच्या बनसवारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात 90 बालके मृत्युमुखी पडल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राजस्थान सरकारला नोटीस बजाविली असून, चार आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

रुग्णालयाच्या अहवालानुसार खराब सुविधा आणि अस्वच्छता याबाबतचे अपवाद वगळले, तरी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणाही जास्त गंभीर असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.

या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राजस्थानच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवून महिन्याभरात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयाची स्थिती सुधारण्यासाठी काय पावले उचलली आहेत हेसुद्धा नमूद करण्यास सांगितले आहे. या प्रकारच्या बाल मृत्यूच्या घटना रोखण्यासाठी कोणत्या रुग्णालयाला संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत किंवा नाही याचीही माहिती नमूद करण्यास सांगितले आहे, असे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत बनसवारा जिल्ह्यातील एम. जी. रुग्णालयात झालेल्या 90 बालकांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Web Title: new delhi news Human Rights Commission notice to Rajasthan government