विमान प्रवासातील बेशिस्तीला चाप

विमान प्रवासातील बेशिस्तीला चाप

सरकारकडून नो-फ्लाय यादी जारी; दोन महिन्यांपासून आजीवन बंदीपर्यंत शिक्षा

नवी दिल्ली: विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या धोरणांतर्गत केंद्रीय मुलकी विमान वाहतूक मंत्रालयाने देशातील पहिली नो फ्लाय यादी आज जारी केली. यातील नियमांनुसार विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना या काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्ह्याच्या प्रमाणात दोन महिन्यांपासून आजीवन विमानप्रवास करण्यास बंदी घातली जाईल. मंत्री जयंत सिन्हा यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली. या शिक्षेविरुद्ध संबंधित न्यायालयात जाऊ शकतात, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी या वर्षी मार्चमध्ये एअर इंडियाच्या अधिकाऱ्यास भरविमानात पायातील सॅंडलने 25 वेळा मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते. त्यानंतर विमानात गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईबाबत हालचाली करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाने केल्या. विविध देशांतील संबंधित कायद्यांचा अभ्यास केल्यावर मंत्रालयाने ही नो फ्लाय नियमावली तयार केली. गृह मंत्रालयाने संशयितांबाबत कळविले तर त्यालाही या यादीत टाकले जाणार आहे.
ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन (एआयसीसीए) व विमान कंपन्यांच्या ऑफ इंडियन एअरलाइन्स संघटनेने गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर जबर कारवाई करण्याबाबत अनुकूल मत व्यक्त केले होते. त्यानंतर आजची यादी तयार केली गेली. यानुसार एखाद्या प्रवाशाला या काळ्या यादीत टाकले गेले, तर तो कोणत्याही विमानाचे तिकीट आरक्षित करूच शकणार नाही. याची माहिती संशयिताप्रमाणे विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर जारी केली जाईल. यासाठी आता विमान तिकीट काढताना संबंधितांचा आधार क्रमांकही घेतला जाऊ शकतो.

इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट संघटनेच्या (आयएटीए) माहितीनुसार विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे. 2015 मध्ये 10 हजार 854 प्रवाशांविरुद्ध तक्रारी आल्या. म्हणजेच दर हजार विमानांमागे किमान एक प्रवासी बेशिस्त वर्तन करतोच. विमान प्रवास कायदा 1972 नुसार विमान कंपन्या एखाद्या प्रवाशावर प्रवासबंदीची कारवाई करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com