देशभरात 1.62 लाख कंपन्यांनी नोंदणी रद्द: अरुण जेटली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून बनावट कंपन्यांवर कारवाई सुरू असून, यात व्यवसाय न करणाऱ्या 1.62 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून बनावट कंपन्यांवर कारवाई सुरू असून, यात व्यवसाय न करणाऱ्या 1.62 लाख कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी दिली.

लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, ""कंपनी कायद्यांतर्गत बनावट कंपन्यांची व्याख्या करण्यात आलेली नाही. बनावट कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. कोणताही व्यवसाय न करणाऱ्या 1 लाख 62 हजार 618 कंपन्यांनी नोंदणी सरकारने रद्द केली आहे. सरकारकडून यावर्षी 12 जुलैपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे. बनावट कंपन्यांवर कारवाईचा सुचविण्यासाठी विशेष कृती पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने केलेल्या शिफारशींनुसार बनावट कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.''

सलग दोन वर्षे व्यवसाय न करणाऱ्या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार कंपनी निबंधकांना आहे, असे त्यांनी नमूद केले. काळा पैसा आणि हवाला व्यवहारांसाठी वापर होत असलेल्या बनावट कंपन्यांवर सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत प्रश्‍नोत्तराच्या तासात विचारणा करण्यात आली होती.

Web Title: new delhi news india Companies Registration canceled Arun Jaitley