भारतीय रेल्वे ऑनलाइन परिक्षा घेऊन वाचवणार चार लाख झाडे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

नवी दिल्लीः भारतीय रेल्वेने विविध पदांसाठी भरती करण्यासाठी ऑनलाइन परिक्षा घेऊन किमान चार लाख झाडे वाचवणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

भारतीय रेल्वेमध्ये भरती करण्यासाठी विविध पातळ्यांवरून चाचण्या घेतल्या जातात. यामध्ये मुलाखतीसाठी पत्रे, प्रश्नपत्रिका, नियुक्ती पत्रांचा समावेश असतो. भारतीय रेल्वेने यंदा ऑनलाइनला महत्व दिले असून, किमान 319 कोटी पेपर शिट्सची बचत होणार आहे. एवढ्या कागदांसाठी 4 लाख झाडांची कत्तल करावी लागली असती. परंतु, ऑनलाइनमुळे 4 लाख झाडे वाचली आहेत, असे अधिकाऱयांनी सांगितले.

भरतीदरम्यान तीन टप्प्यात परिक्षा घेतली जाते. यापुर्वी यासाठी कागदांचा वापर केला जात होता. परंतु, ऑनलाइनमुळे कागदांची मोठी बचत झाली आहे. जगात सर्वात मोठी ऑनलाइन परिक्षा भारतीय रेल्वेने आयोजित केली आहे. भारतीय रेल्वेमधील विविध विभागांमध्ये 14 हजार जणांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी प्रथमच ऑनलाइन परिक्षा घेतली जाणार असून, 351 केंद्रावरून 92 लाख जण परिक्षा देणार आहेत. ऑनलाइन परिक्षा घेतल्यामुळे कागदाबरोबरच वेळेचीही मोठी बचत होणार आहे. शिवाय पारदर्श कारभार असणार आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.

Web Title: new delhi news Indian Railway online tests saves four lakh trees