दसऱ्याला आयफोनचे भारतात सीमोल्लंघन

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

आयफोन 8 व 8+ 29 सप्टेंबरपासून तर आयफोन एक्‍स 2 नोव्हेंबरपासून विक्रीला

नवी दिल्ली: अमेरिकन कंपनी ऍपलने प्रथमच आयफोन 8, 8+ आणि आयफोन एक्‍स एकत्रितपणे बाजारात आणले आहेत. ऍपलचे सीईओ टीम कुक यांनी कॅलिफॉर्निया येथे या आयफोनचे अनावरण केले. आयफोन 8, 8+ आणि आयफोन एक्‍सचे बुकींग 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, भारतामध्ये 29 सप्टेंबरला आयफोन 8 विक्रीला उपलब्ध होणार आहे, तर 2 नोव्हेंबरला आयफोन एक्‍स भारतीयांसाठी उपलब्ध असणार आहे. आयफोन 8 ची भारतातील किंमत 64 हजारांपासून पुढे तर आयफोन एक्‍सची किंमत 89 हजार रुपयांपासून पुढे असणार आहे.

अशा असतील आयफोनच्या किंमती
आयफोन 8
64 जीबी व्हेरियंट : 64 हजारांपासून पुढे
256 जीबी व्हेरियंट : 77 हजारांपासून पुढे

आयफोन 8+
64 जीबी व्हेरियंट : 73 हजारांपासून पुढे
256 जीबी व्हेरियंट : 86 हजारांपासून पुढे

आयफोन एक्‍स
89 हजारांपासून पुढे

आयफोन 8 व 8+ची वैशिष्ट्ये
1) 64 जीबी व्हेरियंट व 256 जीबी व्हेरियंट आदी मॉडेलमध्ये उपलब्ध
2) डुअल 12 मेगापिक्‍सल रेअर कॅमेरा
3) A 11 प्रोसेसर
4) रेटीना एचडी डिस्प्ले
5) स्पेस ग्रे, सिल्व्हर आणि गोल्ड रंगात उपलब्ध

आयफोन एक्‍सची वैशिष्ट्ये
1) फेस रिकग्निशन सेन्सर ट्रू डेप्थ कॅमेऱ्यासह
2) 5.8 इंच सुपर रेटीना डिस्प्ले
3) डस्ट व वॉटर रेसिस्टंट
4) डुअल 12 मेगापिक्‍सल रेअर कॅमेरा
5) A 11 प्रोसेसर, ऑल ग्लास फ्रंट अँड ब्लॅक
6) वायरलेस चार्जिंग
7) ऑल स्क्रीन डिस्प्ले (सेंटर बटन असणार नाही)
8) सिल्व्हर व स्पेस ग्रे रंगात उपलब्ध

Web Title: new delhi news iphone india and dussehra

टॅग्स