कपिल मिश्रा यांना दिल्ली विधानसभेत धक्काबुकी

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांना आप पक्षाच्या आमदारांनी धक्काबुकी केल्याचा प्रकार आज दिल्ली विधानसभेत घडला. त्यामुळे मिश्रा यांना सभागृहाबाहेर नेण्यासाठी मार्शलना पाचारण करावे लागले. जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनातच प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विशेष अधिवेशनात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दिल्लीच्या रुग्णालयातील औषधांच्या उपलब्धतेवरून सभागृहाला माहिती देत होते. त्याचवेळी मिश्रा हातात बॅनर घेऊन उभे राहिले. या बॅनरवर अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांनी भ्रष्टाचार केल्याचे लिहिले होते. हे पाहून आपचे आमदार संतापले आणि त्यांनी विधानसभेतच मिश्रा यांना धक्काबुकी केली आणि पोस्टर हिसकावून घेतले. सभागृहातील धुमशान पाहून विधानसभाध्यक्ष रामनिवास गोयल यांनी मिश्रा यांना सभागृहाबाहेर नेण्यासाठी मार्शल बोलावले.

दरम्यान, सभागृहाबाहेर मिश्रा म्हणाले की, कालच विधानसभा अध्यक्षांना बोलण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र, मला सभागृहातच मदनलाल आणि अमानतुल्लाह खान यांच्यासह अनेक आमदारांनी मारहाण केली. ही मारहाण सिसोदियांच्या सांगण्यावरून केल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला. येत्या 3 जूनला पुराव्याचे प्रदर्शन भरवणार असून, त्यात अनेक गैरव्यवहाराच्या दस्तावेजाचा समावेश असणार आहे, असे मिश्रा म्हणाले.

Web Title: new delhi news kapil mishra aap mla assaulted by in assembly