कार्ती चिदंबरम यांची सीबीआयकडून पुन्हा चौकशी

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांची भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) पुन्हा चौकशी केली. कार्ती यांनी पीटर मुकरेजा आणि त्यांची पत्नी इंद्राणी हिला परकी निधी आणण्यासाठी बेकायदा परवानगी दिल्याने सीबीआयने कार्ती यांची चौकशी केली.

कार्ती सकाळी साडेअकरच्या सुमारास सीबीआयच्या मुख्य कार्यालयात आले होते. कार्ती यांच्यासह भास्कर रामन, रवी विश्‍वनाथन आणि मोहन प्रकाश यांचीही याप्रकरणात चौकशी करण्यात आली. पीटर मुकरेजा चालवत असलेल्या आयएनएक्‍स या वाहिनीकडून एका कंपनीला पैसे पुरविण्यात आले होते. या कंपनीचे अप्रत्यक्ष नियंत्रण कार्ती यांच्याकडे होते. या आधी 23 ऑगस्टला कार्ती यांची सीबीआयने चौकशी केली होती. आयएनएक्‍स वाहिनीचा मालक पीटर मुकरेजा आणि त्याची पत्नी इंद्राणी तिची मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

कार्ती यांच्या चौकशीबाबत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर सीबीआयचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. सीबीआयला कार्ती यांना लक्ष्य करण्यास सांगितले असल्याचेही चिदंबरम यांच्या आरोप आहे. सीबीआयकडे सध्या शंभराहून अधिक प्रकरणे प्रलंबित असताना कार्ती यांनाच केवळ लक्ष्य केले जात असल्याचे चिदंबरम यांचे म्हणणे आहे.

Web Title: new delhi news karti chidambaram and cbi