कार्ती चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती एअरसेल-मॅक्‍सीसप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषणने (सीबीआय) कार्ती यांना समन्स पाठवले होते. सीबीआयने समन्समध्ये कार्ती यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत विचारणा केली आहे.

सीबीआयने पाठविलेले समन्स हे बेकायदेशीर असून, हेतूपुरस्सर पाठविलेले असून, यामुळे कार्ती व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक तणावातून जावे लागले असल्याचे सर्वोच्च न्यायालयात केलेल्या सादरीकरणामध्ये म्हटले आहे. कार्ती यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 32 नुसार सीबीआयच्या समन्सविरोधात याचिका दाखल केली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले.

सीबीआय समन्सद्वारे कार्ती व त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. कार्ती यांचे वडील हे एका प्रमुख पक्षाचे बडे नेते असून, त्यांच्या मानहानीचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: new delhi news Karti Chidambaram in the Supreme Court