केजरीवालांची मोटार गाझियाबादेत सापडली

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : दिल्लीतील सचिवालयासमोरून दोन दिवसांपूर्वी चोरीस गेलेली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची "वॅगनआर' ही गाडी आज गाझियाबादेत सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

केजरीवाल यांनी आपल्या करिअरच्या सुरवातीस ही चारचाकी विकत घेतली होती. दिल्लीतील प्रचारामध्येही त्यांनी तिचा वापर केला होता. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर "आप'चे नेते आणि कार्यकर्ते या गाडीचा वापर करत होते. चोरट्यांनी ही गाडी गाझियाबादेत रस्त्यावरच सोडून दिली होती. गाडीचे इंजिन आणि क्रमांकाची खातरजमा केली असता ही गाडी मुख्यमंत्र्यांचीच असल्याचे स्पष्ट झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

या गाडीची चोरी झाल्यानंतर केजरीवाल यांनी तातडीने राज्यपाल अनिल बैजल यांना पत्र लिहित राज्यातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली होती. आम आदमीच्या कार्यकर्त्यांनीही याप्रकरणी यंत्रणेस धारेवर धरले होते.

Web Title: new delhi news Kejriwal's car was found in Ghaziabad