आमच्या कुटुंबात कोणीही दहशतवादी नाही

आमच्या कुटुंबात कोणीही दहशतवादी नाही

हादियाच्या वडिलांचे स्पष्टीकरण; न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली: केरळमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणातील पीडित मुलगी हादिया हिला पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची मुभा देण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.27) घेतला. हादियाचे वडील के. एम. अशोकन यांनी या निर्णयाचे आज स्वागत केले आहे. तसेच आमच्या कुटुंबात कोणीही दहशतवादी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आंतरधर्मीय विवाहाबद्दल विचारले असता अशोकन म्हणाले की, आपण एकाच धर्मावर, एकाच देवावर विश्‍वास ठेवतो. मात्र, आमच्या कुटुंबात कोणीही दहशतवादी नाही. इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर हादिया सीरियाला जाऊ इच्छिते; पण त्या देशाबद्दल तिला काहीही माहिती नाही. हादियाला अशा सर्व कटू अनुभवातून जावे लागले व त्यामुळे तिचे शिक्षणही खंडित झाले, याचे मला दुःख आहे; पण आता तिला पुढील शिक्षण घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली असल्याने मला आनंद वाटत आहे.

हादियाला नजरकैदेत ठेवल्याचा तिचा पती शफीन जहान याचा आरोप अशोकन यांनी फेटाळून लावला. ""घरात आणि बाहेरही तिच्याभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. असे सांगून ते म्हणाले तमिळनाडूतील सालेममधील तिच्या सुरक्षेविषयी आपल्याला चिंता वाटत नाही. कारण, आता ती सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षणात आणि निरीक्षणाखाली आहे.'' हादिया हिला तमिळनाडूतील सालेम येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्याची मुभा देण्यात यावी आणि पालक किंवा पतीऐवजी महाविद्यालयाच्या डीनने तिची जबाबदारी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावर बोलताना अशोकन म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय मला मान्य आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास मी गरजेनुसार सालेमला जाऊन तिची भेट घेईन. न्यायालयाने तिचे पालकत्व शफीन जहानसह अन्य कोणासही दिलेले नाही. माझ्यासारख्या अगदी निकटच्या नातेवाइकांनाच न्यायालयाने परवानगी दिली आहे. केरळ पोलिसांच्या बंदोबस्तात हादिया आज सालेमला रवाना झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com