सोनिया गांधींचे महिला आरक्षणाचे विधेयकाबाबात मोदींना पत्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

महिला आरक्षणासंदर्भातील विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात केंद्राकडून चालढकल होत आहे. या विधेयकाप्रती सरकारला खरच काळजी आहे का, की तो नुसता दिखाऊपणा आहे, हे सरकारने दाखवून द्यावे.
- सुष्मिता देव, कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख

नवी दिल्ली: लोकसभेत आपल्याला पूर्ण बहुमत आहे. याचा फायदा घेत महिला आरक्षणाचे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी विनंती कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. या विधेयकास आपला पक्ष पाठिंबा देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

"महिला आरक्षणाच्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळणे, हे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल. केंद्र सरकारने बहुमताचा फायदा घेत हे विधेयक मंजूर करून घ्यावे,'' असे सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र त्यांनी 20 सप्टेंबर रोजी पाठविले आहे.

सर्वप्रथम कॉंग्रेस व दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायती व नगरपालिकांमध्ये महिलांना आरक्षण मिळावे म्हणून पावले उचलली होती. याचे स्मरण करून देतानाच 1989 मध्ये विरोधकांनी या विधेयकास विरोध केल्याची आठवणही सोनिया गांधी यांनी सरकारला करून दिली.

Web Title: new delhi news Letter from Modi to Sonia Gandhi's Women's Reservation Bill