'एमएसपी'बाबत संभ्रम निर्माण केला जातोय

वृत्तसंस्था
शनिवार, 17 मार्च 2018

कृषी उन्नती मेळाव्यात मोदींचा विरोधकांवर आरोप

नवी दिल्ली: पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) दीडपट करण्याच्या अर्थसंकल्पातील निर्णयाविषयी विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जात असून, शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या "एमएसपी'चा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत मिळून काम करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली.

येथे आयोजित कृषी उन्नती मेळाव्यात ते बोलत होते. मोदी म्हणाले, ""शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तेलबियांचे उत्पादन घ्यावे. यामुळे खाद्यतेलासाठी इतर देशांवर असलेले अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. युरियाचा वापर 2022 पर्यंत निम्म्याने कमी करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी करावा. यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, सूचित केलेल्या पिकांसाठी खर्चाच्या दीडपट "एसएमपी' देण्याचेही ठरले आहे.''
शेतकऱ्यांना कर्ज घेण्यात अडचणी येऊ नयेत, असा सरकारचा प्रयत्न असून, यापूर्वी दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा (10 लाख कोटी) आता 11 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती मोदी यांनी दिली. कृषी क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य सरकारने समोर ठेवले आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

पाला-पाचट जाळू नका
प्रदूषणाला आवर घालण्यासाठी पिकांच्या काढणीनंतर शेतात उरलेली बुडके, पाचट जाळू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केले. शेतात उरलेले पाचट व बुडके जाळल्याने प्रदूषण तर होतेच; पण त्याबरोबर मातीची पतही खराब होते. या गोष्टी मशिनच्या साह्याने खतांबरोबर शेतातच विखुरल्या, तर मातीची उत्पादन क्षमता वाढते, असेही मोदी म्हणाले.

Web Title: new delhi news mpsc and politics