भारतीयांना सक्षम बनविण्यात मोदी सरकारला यश: स्वराज

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

नवी दिल्ली: "सबका साथ, सबका विकास'द्वारे देशातील नागरिक तसेच, परदेशातील अनिवासी भारतीयांना सक्षम बनविण्यात मोदी सरकारला यश आले आहे, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज केले.

मोदी सरकारने तीन वर्ष पूर्ण केल्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. स्वराज म्हणाल्या, "सर्व स्तरातील नागरिक तसेच, तरुण, महिला यांचे सक्षमीकरण होण्यास मोदी सरकारच्या विविध योजना कारणीभूत आहेत. विविध कल्याणकारी कार्यक्रम राबवून समाजाच्या तळागाळातील व्यक्तींचा विकास साधण्यास मोदी सरकारला यश आले आहे.'

परदेशात असणाऱ्या अनिवासी भारतीयांचा या सरकारवर विश्वास असून, गरज पडल्यास मोदी सरकार आपल्या मदतीला धावून येईल, असे त्यांना मनोमन वाटते. तीन वर्षाच्या कारकिर्दीत सरकारने विविध देशांत अडचणीत सापडलेल्या सुमारे 1 लाख 25 हजार नागरिकांची सुटका केली आहे. इतकेच नव्हे तर, येमेनमधून 1947 परदेशी नागरिकांची सुटका करण्याची कामगिरीही मोदी सरकारने पार पाडली. त्यापैकी तीन पाकिस्तानी नागरिक होते, अशी माहिती स्वराज यांनी या वेळी दिली.

Web Title: new delhi news narendra modi government and sushma swaraj