नरेंद्र मोदींचे भाषण हेच शासन आहे का?

rahul gandhi
rahul gandhi

राहुल गांधी यांची ट्विटरवरून टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत गुजरातच्या प्रचार मोहिमेत विकासाचा मुद्दा का दिसत नाही, असा सवाल केला आहे. मोदी यांना आपण गुजरातच्या रिपोर्ट कार्डबाबत दहा प्रश्‍न विचारले होते, पण त्यातील एकाही प्रश्‍नाचे उत्तर मिळालेले नाही. राज्यामध्ये भाजप 22 वर्षांपासून सत्तेत असूनही त्यांना हे शक्‍य झालेले नाही. मग मोदींचे भाषण हेच शासन आहे का? असा सवालही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

राहुल म्हणाले, ""मोदींच्या भाषणातून विकासाचा मुद्दा का हरवला आहे, पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण होत नाही तोवर भाजपने साधा जाहीरनामाही प्रसिद्ध केला नव्हता. त्यामुळे आपल्याकडे पंतप्रधानांचे भाषण हेच शासन आहे का?'' मोदींना लक्ष्य करण्यासाठी राहुल हे ट्विटरच्या माध्यमातून त्यांना रोज प्रश्‍न विचारत आहेत. "22 साल का हिसाब, गुजरात मॉंगे जवाब' अशी त्यांच्या प्रश्‍नावलीची टॅगलाइन आहे. गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असल्याने राहुल गांधी यांनी तरुणांना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

"ऑफर मिळाली तर काँग्रेसमध्ये'
पटेल समाजाचा युवा चेहरा हार्दिक पटेल याने चांगली ऑफर मिळाली तर आपण काँग्रेसमध्येही प्रवेश करू, असे म्हटले आहे. राहुल यांच्यामध्ये खूप सुधारणा झाली असून, लोक त्यांना ऐकू लागले आहेत. माझ्या समाजाला जे वाटते तेच मी करेल. मी काँग्रेसमध्ये सहभागी व्हावे, अशी पटेलांची इच्छा असेल तर आपण राहुल यांच्यासोबतही हातमिळवणी करू, असे हार्दिकने स्पष्ट केले. भाजपच्या दबावामुळे माझे सहकारी दुरावले असले, तरीदेखील याचा सभांवर परिणाम झालेला नाही. दिवसेंदिवस माझ्या सभांना होणारी गर्दी वाढत चालली आहे, असेही तो म्हणाला.

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशीद या दोन्ही वास्तू उभारल्या जाव्यात; पण मंदिर बांधल्याने रोजगार वाढणार नाहीत. भाजप मुख्य मुद्यांकडे दुर्लक्ष का करत आहे? राज्यातील जनतेला सर्व काही दिसत आहे.
- हार्दिक पटेल, पटेल समाजाचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com