एनसीआरसाठी आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

नवी दिल्ली: केंद्र सरकारने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर)साठी आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी दिली आहे. नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपती म्हणाले, की एनसीआरमध्ये विमान प्रवाशांची वाढती संख्या पाहता ग्रेटर नोईडाच्या जेवर येथे नवीन विमानतळाला तात्त्विक मंजुरी दिली आहे. येत्या दहा-पंधरा वर्षांत दरवर्षी तीन ते पाच कोटी प्रवाशांची नोंद होईल, अशी अपेक्षाही गजपती यांनी व्यक्त केली.

एका अहवालानुसार, जेवर आंतराष्ट्रीय विमानतळ 3 हजार हेक्‍टर क्षेत्रावर उभारले जाणार असून, त्यासाठी सुमारे 20 हजार कोटी खर्च होणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ 1 हजार हेक्‍टर जमिनीचा विकास केला जाणार असून, त्यावर दहा हजार कोटी खर्चाचा अंदाज आहे. यात जीएमआर इन्फ्रास्ट्रक्‍चरबरोबरच पीपीपी योजनेनुसार विकसित केला जाणार आहे. नागरी विमान उड्डाण सचिव चौबे म्हणाले, की पाच वर्षांत विमानतळाची इमारत उभारली जाईल. या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विमानतळासाठी आपली जमीन अटींवर देण्यास तयारी दाखवली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ग्रेटर नोईडाच्या जेवर येथे विमानतळ करण्याचा प्रस्ताव 2003 मध्ये उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांच्याकडून मांडण्यात आला होता. मात्र 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यांनी जेवरऐवजी आग्रा-मथुरादरम्यान विमानतळ उभारण्याची मागणी केली होती. विद्यमान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा विमानतळाचा प्रस्ताव मांडला होता.

Web Title: new delhi news ncr and international airport