नेपाळच्या पंतप्रधानांना परराष्ट्रमंत्र्यांनी पाणी पाजले

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

देऊबांना खोकला आल्याने स्वराज यांची मदत

दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित समस्यांसाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे कोणी ट्‌विटरवरूनही संपर्क साधल्यास त्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. त्यांच्या मदतीचा अनुभव नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनाही गुरुवारी आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना देऊबा यांना खोकल्याची उबळ आली. ते पाहून सुषमा स्वराज यांनी तत्परतेने त्यांना पाणी दिले. त्यांच्या या कृतीतून भारतीय आदरातिथ्याचे दर्शन घडविले.

मोदी व देऊबा यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये काल द्विपक्षीय चर्चा झाली. याची माहिती दोघांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली. देऊबा भाषण करीत असतानाच त्यांना खोकल्याची उबळ आली. त्यांना खोकताना पाहून समोरच्या रांगेत बसलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज तत्परतेने स्वतः उठून देऊबा यांच्या जवळ गेल्या. पंतप्रधानांनी त्यांच्यासमोरील पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडले अन्‌ स्वराज यांनी त्यातील पाणी ग्लासात ओतून ते देऊबा यांना दिले.

देऊबा आपले भाषण करीत असल्याने त्यांचे लक्ष गेले नाही. नंतर हातात ग्लास घेऊन स्वराज समोर उभ्या आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. यावर आश्‍चर्याने "माझा घसा खराब झाला,' असे म्हणत स्वराज यांच्या हातातील ग्लास घेऊन ते पाणी प्यायले. त्यांचे पाणी पिऊन झाल्यावर ग्लास जागेवर ठेवण्यासाठी सुषमा स्वराज तेथेच थांबल्या. त्या वेळी एक अधिकारी तेथे पोचला. त्यानंतर स्वराज आपल्या जागेवर परतल्या अन्‌ देऊबा यांनी आपले भाषण पुढे सुरू ठेवले.

Web Title: new delhi news nepal sher bahadur deuba water india sushma swaraj