नोटाबंदीच्या विरोधात 'काळा दिवस'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

गुलाम नबी आझाद ः आठ नोव्हेंबरला देशभरात निषेध कार्यक्रम

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या निर्णयाला येत्या आठ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होणार असून, या दिवशी सर्व विरोधी पक्षांनी देशभरात "काळा दिवस' पाळण्याचे ठरविले आहे. सभा, निषेध मोर्चे, धरणे, आंदोलने यातून आपला विरोध व्यक्त करतील. मात्र हा विरोध एकजुटीने नव्हे, तर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे व्यक्त करणार आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी आज पत्रकार परिषेदत "काळा दिवस' पाळण्याची घोषणा केली. नोटाबंदी हा देशाबरोबर झालेला सर्वांत मोठा विश्‍वासघात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला.

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने एकजूट झालेल्या 18 विरोधी पक्षांनी सरकारविरुद्ध संसदेत आणि संसदेच्या बाहेर एकत्रित रणनीती ठरविण्यासाठी सहमती व्यक्त केली होती. त्यानंतर सर्वानुमते सात पक्षांचा समावेश असलेली समन्वय समितीही स्थापन करण्यात आली होती. या समन्वय समितीची काल (ता. 23) बैठक होऊन त्यात नोटाबंदीविरुद्ध देशभरात आंदोलन करण्याचे ठरले होते. त्यानंतर आज औपचारिक घोषणा करण्यात आली. आझाद यांच्यासमवेत तृणमूल कॉंग्रेस नेते डेरेक ओब्रायन आणि शरद यादव उपस्थित होते. समन्वय समितीच्या काल झालेल्या बैठकीत आझाद, शरद यादव (जेडीयू-बंडखोर) डेरेक ओब्रायन (तृणमूल कॉंग्रेस), डी. राजा (भाकप), कनिमोळी (द्रमुक), सतीशचंद्र मिश्रा (बहुजन समाज पक्ष) उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव अनुपस्थित होते. परंतु संसदेत विरोधकांमध्ये कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खालोखाल संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला समन्वय समितीमध्ये स्थान नाही.

आझाद म्हणाले, की नोटाबंदी म्हणजे देशाबरोबर सर्वांत मोठा विश्‍वासघात होता. त्याविरुद्ध सर्व विरोधी पक्ष देशभरात "काळा दिवस' पाळतील. सहकारी पक्ष आपापल्या राज्यांमध्ये, आपापल्या पद्धतीने आंदोलनातून विरोध व्यक्त करील. नोटाबंदी हा देशातील आजपर्यंतचा सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, या निर्णयावर 18 विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर सरकारने आजतागायत दिलेले नाही, असे सांगत, या निषेधार्थ आठ नोव्हेंबरला "काळा दिवस' पाळला जाईल, असे ते म्हणाले.

राहुल यांच्याबाबत मौन
सर्व विरोधी पक्षांचे सरकारविरोधातील शक्तिप्रदर्शन एकत्रित नव्हे तर स्वतंत्रपणे होणार आहे, याचा खुलासा करताना आझाद म्हणाले, की सर्व राजकीय पक्ष स्वतंत्र आहेत. नेतेमंडळींना एकत्र येणे शक्‍य असले तरी आपापले कार्यकर्ते व मतदारांना एकत्र आणणे अवघड असते, अशी कबुलीही त्यांनी दिली. मात्र राष्ट्रीय राजधानी दिल्लीत नेमके कशा प्रकारचे आंदोलन केले जाईल, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यात सहभागी होतील की नाही, या प्रश्‍नांवर आझाद यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

Web Title: new delhi news nota bandi and black day