दाऊदला पाकिस्तानचाच आश्रय : गृह सचिव

पीटीआय
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : 1993च्या मुंबई साखळी बॉंबस्फोटातील प्रमुख संशयित कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पकिस्तानातच असून, हा देश त्याला भारतात आणण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण करत असल्याचे केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांनी आज येथे स्पष्ट केले.

ते म्हणाले, दाऊदला भारतात परत आणण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व कारवाई करेल. पाकिस्तानने दाऊदला आश्रय दिला असून, कायद्यासमोर उभे करण्यासाठी त्याला भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण करत आहे. महर्षी उद्या (गुरुवारी) या पदावरून निवृत्त होत आहेत.

पाकिस्तानची वृत्ती आंतरराष्ट्रीय कायद्याशी जुळवून घेण्यातली नाही आणि दाऊदच्या प्रकरणात हा देश भारताविरुद्ध काम करत आहे. यासाठी आवश्‍यक कारवाई आम्ही करू. आम्ही त्याला योग्यवेळी परत आणू. यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही महर्षी यांनी दिली.

ंमुंबईत 1993मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोट प्रकरणात दाऊद मुख्य संशयित आहे. या बॉंबस्फोटांत 260 जण मृत्युमुखी पडले होते आणि 700पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर त्याने भारतातून पलायन केले आणि सद्यःस्थितीत तो पाकिस्तानमध्ये लपला आहे.

Web Title: new delhi news pakistan dawood ibrahim and rajiv mehrishi