पंतप्रधान मोदींकडे 1 कोटीची मालमत्ता

यूएनआय
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2016-17 या आर्थिक वर्षात 1 कोटी 13 हजार 403 रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती एका सरकारी संकेतस्थळाद्वारे उघड झाली आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2016-17 या आर्थिक वर्षात 1 कोटी 13 हजार 403 रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती एका सरकारी संकेतस्थळाद्वारे उघड झाली आहे.

मोदी यांच्याकडे एकूण मालमत्तेपैकी 1.5 लाख रुपये रोख स्वरूपात असून, गतवर्षी हा आकडा 89 हजार 700 रुपये इतका होता. पारदर्शक कारभाराचे प्रतीक म्हणून नरेंद्र मोदी यांनी आपल्या मालमत्तेची माहिती सादर केली असून, त्यांच्यासोबत मंत्रिमंडळातील केवळ 15 मंत्र्यांनीच आपल्या मालमत्तेचा तपशीप जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात प्रामुख्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नक्वी यांचा समावेश आहे.
जेटली यांच्या संपत्तीत गतवर्षीच्या तुलनेत (60.99 कोटी) वाढ होत ती 67.62 कोटी रुपये झाली आहे. त्यांच्या चार बॅंक खात्यांमध्ये 64 लाख रुपयांची रक्कम असून, 1.29 कोटी रुपयांच्या दागिन्यांचाही यात समावेश आहे. स्वराज यांच्याकडे 5.33 कोटी, तर प्रकाश जावडेकर यांच्याकडे 1.55 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानुसार, मंत्रिमंडळात 92 मंत्र्यांचा सहभाग आहे.

तपशील सादर न केलेले मंत्री
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल, मेनका गांधी, स्मृती इराणी यांच्यासह अनेक मंत्र्यांना आपल्या मालमत्तेचा तपशील 31 ऑगस्टपूर्वी सादर करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: new delhi news Prime Minister Modi's property worth Rs.1 crores