'राफेल'चा व्यवहार अपारदर्शक; काँग्रेसचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 11 मार्च 2018

भाजपकडून स्पष्टीकरण मिळण्याची मागणी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीला विश्‍वासात न घेता केलेला 36 राफेल विमाने खरेदीचा व्यवहार संशयास्पद व अपारदर्शक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सलग दोन दिवस हा आरोप भाजपने फेटाळूनही काँग्रेसचे समाधान झालेले नाही.

भाजपकडून स्पष्टीकरण मिळण्याची मागणी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीला विश्‍वासात न घेता केलेला 36 राफेल विमाने खरेदीचा व्यवहार संशयास्पद व अपारदर्शक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सलग दोन दिवस हा आरोप भाजपने फेटाळूनही काँग्रेसचे समाधान झालेले नाही.

राफेल व्यवहार हा संशयास्पद आहे आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सातत्याने त्याबाबत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. तसेच या विषयावर संसदेतही चर्चा करण्याची काँग्रेसला इच्छा आहे; परंतु गोंधळ करून हा संवेदनशील विषय उपस्थित करू देण्यापासून काँग्रेसला संसदेत रोखले जात असल्याचा आरोपही काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी काल (ता. 9) केला होता. आजही काँग्रेस प्रवक्‍त्यांनी भाजपकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले. त्याचप्रमाणे हवाईदलास 126 विमानांची गरज असताना केवळ 36 विमानांची खरेदी करणे ही देशाच्या संरक्षणाशी तडजोड आहे; तसेच वाजवीपेक्षा अधिक किमतीला ती खरेदी केल्याकडेही काँग्रेसने लक्ष वेधून केवळ मोदी हेच याबाबत खुलासा करू शकतात, असे सांगून त्यांच्याकडून निवेदनाची मागणी केली. भारताने राफेल विमाने वाजवीपेक्षा अधिक किंमत देऊन खरेदी केल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.

काँग्रेस पक्षाने या व्यवहाराबाबत काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव, विचारविनिमय व सल्लामसलतीची प्रक्रिया न करणे, केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीस अंधारात ठेवणे, अवाजवी किंमतवाढ, तंत्रज्ञान हस्तांतराला फाटा, रिलायन्ससारख्या विमाननिर्मितीचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्‍ससारख्या अनुभवी सरकारी कंपनीला मात्र पाने पुसणे या मुद्यांचा समावेश आहे.

Web Title: new delhi news rafale fighter plane and congress