राहुल गांधी यांची 'भाजप भगाओ'ला दांडी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी नॉर्वेची राजधानी ओस्लोला रवाना झाले. तेथील राजकीय नेते व उद्योजकांची ते भेट घेणार आहेत. या दौऱ्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रविवारी (ता.27) पाटण्यात आयोजित केलेल्या विरोधकांच्या मेळाव्याला राहुल गांधी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले.

नॉर्वे दौऱ्याची माहिती राहुल यांनी ट्विटरवर दिली आहे. "नॉर्वेच्या परराष्ट्रीय मंत्रालयाच्या निमंत्रणावरून आपण काही दिवस ओस्लोला जाणार आहोत. तेथे राजकीय नेते, उद्योजक व संशोधन संस्थांना भेट देऊन चर्चा करणार आहोत,'' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यामुळे लालूप्रसाद यांनी विरोधी पक्षांच्या शक्तिप्रदर्शनासाठी पाटण्यात उद्या आयोजित केलेल्या मेळाव्यास राहुल दांडी मारणार आहेत. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीदेखील या मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. कॉंग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद हे या मेळाव्यात कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

विरोधी पक्षांच्या एकीचे दर्शन घडविण्यासाठी लालू यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षातर्फे उद्या "भाजप भगाओ, देश बचाओ' मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र विरोधी पक्षांमध्ये जागा वाटपाविषयी एकमत झाल्याशिवाय या मेळाव्यात उपस्थित न राहण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी घेतला आहे. त्यामुळे या मेळाव्यात विरोधकांचे एकजूट दिसण्याविषयी साशंकता व्यक्त होत आहे.

Web Title: new delhi news rahul gandhi and bjp bhagao