राहुल हे स्वतः अपयशी नेतेः इराणी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

लोकशाही घराण्यावर नव्हे; कर्तृत्वावर चालते

नवी दिल्ली: "अमेरिकेत जाऊन भारतातील घराणेशाहीवर बोलणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे स्वतःच एक अपयशी घराणेबाज राजकीय नेते आहेत,' असा तिखट प्रतिहल्ला भाजपने आज चढवला. देशातील तीनही सर्वोच्च घटनात्मक पदांवर घराणेशाहीचा वाराही नसलेले नेते आहेत याचा विसर पडलेल्या राहुल यांनी अमेरिकेत जाऊन भारताचा अपमान केल्याची टीका भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली. लोकशाही घराण्यावर नव्हे तर कर्तृत्वावर चालते, असेही त्या म्हणाल्या.

स्वतः खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी चक्क लोकसभेतील सदस्यसंख्येबद्दल बोलतानाही गंभीर चूक केल्याने ते आधीच "ट्रोलर्स'च्या निशाण्यावर आलेले असताना सत्तारूढ पक्षाने स्मृती इराणी यांना पुढे करून समाज माध्यमवीरांना आणखी एक खाद्य मिळवून दिल्याचे मानले जाते. "काश्‍मीर समस्येवर बोलणाऱ्या राहुल गांधी यांनी आधी स्वतःच्या अमेठी मतदारसंघात जाऊन तेथील दयनीय स्थिती पाहिली असती तरी त्यांना भारतीय राजकारणातील गंभीर चूक कोठे आहे हे कळले असते,' असा टोला लगावून स्मृती इराणी म्हणाल्या, की राहुल गांधी यांची पंतप्रधानांवरील टीका नवीन नाही; पण आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वदेशाची निंदा करणे किती अनुचित आहे हे त्यांना माहिती नसेल, तर आश्‍चर्यच आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालीच कॉंग्रेस पक्षात अहंकार आल्याचे राहुल यांनी मान्य केले. यांचे आता देशात कोणी ऐकत नाहीत म्हटल्यावर ते परदेशात जाऊन बोलत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, ""राहुल यांनी सांगितले, की भारतात असेच चालते. घराणेशाहीच इथे सारे काही आहे. वस्तुतः हा देशाचा अपमान आहे. आज पंतप्रधान, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे सारेच गरीब, वंचित व शेतकऱ्यांच्या घरातून आले आहेत. त्यांना घराणेशाहीची काहीही पार्श्‍वभूमी नसून कर्तृत्वाच्या बळावर ते येथे पोचले आहेत. लोकशाही घराणेशाहीवर नव्हे तर गुणवत्तेवर चालते, हेच ते सिद्ध करतात. अमेठी हाच राहुल यांच्या अपयशाचा मापदंड आहे.'' "जीएसटी' व नोटाबंदीबाबत त्या म्हणाल्या, ""जीएसटी' कॉंग्रेस मंजूर करू शकली नाही, याचे कारण म्हणजे कॉंग्रेसने कोणत्याही राज्यावर व राजकीय पक्षावर विश्‍वास ठेवला नाही वा त्यांना विश्‍वासातही घेतले नाही. मोदी यांच्या सरकारने दोन्ही गोष्टी यशस्वीरीत्या करून दाखविल्या.''

Web Title: new delhi news Rahul gandhi himself is a failure: smriti irani