ईदमुळे काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल : सिंह

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

नवी दिल्ली: काश्‍मीरमध्ये शांतता व आनंद निर्माण होण्यास ईदची मदत होईल, अशी आशा व्यक्त करीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्‍मीर खोऱ्यातील नागरिकांना ईदच्या शुभेच्छा सोमवारी दिल्या.

काश्‍मीरमध्ये जवळजवळ वर्षभरापासून अशांतता आहे. या पार्श्‍वभूमीवर ईदचे निमित्त साधून गृहमंत्र्यांनी काश्‍मीरवासीयांसाठी एक व्हिडिओ संदेश पाठविला. काश्‍मीरमधील सर्व स्तरांतील बंधू-भगिनी, युवक, ज्येष्ठ व मुलांना ईदच्या मनापासून शुभेच्छा, असे सिंह यांनी म्हटले आहे.

"माणुसकी व चांगुलपणाची शिकवण देणारा हा सण काश्‍मीर खोऱ्यात शांती, बंधुभाव, आनंद व समझोत्याचे वातावरण तयार करेल व त्यातून एक नवी पहाट उगवेल, असा आपल्याला ठाम विश्‍वास आहे,'' असे ते संदेशात म्हणाले. एका स्वतंत्र ट्‌विट संदेशात त्यांनी ईदनिमित्त देशवासीयांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. जगन्नाथपुरी येथील रथयात्रेलाही शुभेच्छा दिल्या.

Web Title: new delhi news rajnath singh say eid and jammu-kashmir