'व्हीआयपी लाऊंज'मध्ये राम रहीमला प्रवेश नाही

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली : विमानतळांवर महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या (व्हीआयपी) लाऊंजमध्ये डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

"व्हीआयपी लाऊंज'च्या यादीतून राम रहीम याचे नाव सरकारने काढून टाकले आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाना राम रहीम याला बलात्काराच्या दोन प्रकरणांमध्ये 20 वर्षांची शिक्षा सुनावली. या पार्श्‍वभूमीवर त्याचे नाव "व्हीआयपी लाऊंज'मध्ये प्रवेश असलेल्या व्यक्तींच्या यादीतून काढून टाकण्यात आल्याचे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला कळविले आहे.

"व्हीआयपी लाऊंज'मध्ये कोणाला प्रवेश द्यावयाचा हे ठरविण्याचा अधिकार नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला आहे. राम रहीम याचा या यादीत कोणी समावेश केला, हे उघड झालेले नाही. "व्हीआयपी लाऊंज'च्या यादीतून राम रहीमचे नाव वगळण्यात आल्याचे प्राधिकरणाने सर्व विभागीय कार्यकारी संचालक आणि सर्व विमानतळांच्या संचालकांना कळविले आहे. त्यानुसार, यापुढे त्याला "व्हीआयपी लाऊंज'मध्ये प्रवेश देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

Web Title: new delhi news Ram rahim did not have access to VIP lounge