संसदेतील अनुपस्थितीबद्दल मोदींनी सदस्यांना खडसावले

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

नवी दिल्ली: संसदेत सत्तारूढ भाजप सदस्यांच्या उपस्थितीच्या वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकवार जाहीरपणे चिंता व्यक्त केली. "याबाबत आता मलाच काही लक्ष घालावे लागेल असे दिसते,' अशा शब्दांत त्यांनी राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजप खासदारांना खडसावल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेत गेल्या शुक्रवारी (ता. 21) राज्यसभेत बहुतांश भाजप सदस्यांनी दांडी मारल्याने एक सामरिक विधेयक मंजुरीविना सोडून द्यावे लागण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. "सकाळ'ने याबाबतचे वृत्त दिले होते.

भाजप संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक बालयोगी सभागृहात झाली. या वेळी मोदींनी, सत्तारूढ सदस्यांच्या संसदीय उपस्थितीबाबत आपण अजूनही समाधानी नाही, असे सांगितले. सरकारला तीन वर्षे उलटल्यावरही संसदेत उपस्थित राहा असे स्वपक्षीय खासदारांना पुन्हा पुन्हा सांगावे लागणे सूचक मानले जाते. दांडीबहाद्दर खासदारांची संख्या वाढल्याबद्दल त्यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली. या संसदीय बैठकीत लोकसभा व राज्यसभेतील कामकाजाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेच्या कामकाजाची माहिती दिली. त्या वेळी त्यांनी शुक्रवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास झालेल्या भाजपच्या कथित फजितीचाही उल्लेख केला. तो संदर्भ घेऊन मोदींनी अनुपस्थितीबद्दल भाजप खासदारांचे पुन्हा कान उपटले.

देशाच्या प्रगतीचा आलेख सातत्याने वाढत असल्याचा दावा मोदींनी केला. ते म्हणाले, की 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेल्या 70 वर्षांत स्वतंत्र भारताने मोठा पल्ला गाठला आहे. 2022 पर्यंत भारत जागतिक महासत्ता बनण्यासाठी सज्ज आहे.

संकल्प यात्रांचे आयोजन
आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त यंदाही सरकार देशभरात उत्सव साजरा करणार आहे. या सोहळ्याच्या रूपरेषेबाबत मोदींनी स्वपक्षीय खासदारांशी आज प्राथमिक विचारविनिमय केला. यानिमित्ताने देशभरात संकल्प यात्रा काढाव्यात अशा सूचना मोदी यांनी केल्या. या यात्रा 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान काढल्या जाणार असून, त्यात मोदींच्या सभाही होणार असल्याचे कळते.

Web Title: new delhi news sansad member and narendra modi