अल्पवयीन मुलीचे शोषण घृणास्पद गुन्हा : न्यायालय

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण हा घृणास्पद गुन्ह्यापैकी एक असून मुलींच्या निष्पाप जिवाशी खेळण्याचा लाजीरवाणा प्रकार असल्याचे मत दिल्लीच्या एका न्यायालयाने एका सुनावणीदरम्यान व्यक्त केले. नऊ वर्षांच्या मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला दोषी ठरवताना दिल्ली न्यायालयाने मत व्यक्त केले.

10 ऑक्‍टोबर 2012 रोजी दक्षिण-पूर्व दिल्लीत विनयभंगाची घटना घडली होती. दोषी आरोपीने पीडित मुलीचा विनयभंग घरात घुसून केला होता. तेव्हा तिचे पालक घराबाहेर गेले होते. तिच्या पालकांना ही बाब समजताच वडिलांनी आरोपीला मारहाण केली होती. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवताना म्हटले की, तिच्या पालकांच्या पुराव्याचा विचार केला नाही, तरी पीडित मुलीची साक्ष व्यक्तीला दोषी ठरवण्यासाठी पुरेशी आहे. या प्रकरणात आरोपीने अल्पवयीन मुलीचे जे शोषण केले ते घृणास्पद आणि लांच्छनास्पद गुन्हा आहे. तिचा विश्‍वास आणि निष्पाप भावनांशी केलेला क्रूर खेळ आहे, असे न्यायालयाने मत व्यक्त केले. सुनावणीदरम्यान आरोपीने आरोप नाकारले, मात्र तो स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करू शकला नाही.

Web Title: new delhi news Sexual exploitation of a minor girl and court