परकी टपाल कार्यालयामार्फत तस्करी; 15 कोटींच्या वस्तू जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली : परकी टपाल कार्यालयामार्फत सुरू असलेली 15 कोटी रुपयांची तस्करी महसुली गुप्तचर संचलनालयाने पकडली आहे. यात सोने, स्टेरॉईड आणि देशात बंदी असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. परकी टपाल कार्यालयात नियुक्त असलेला सीमा शुल्क विभागाच्या निरीक्षकाचाही यात समावेश आहे. महासंचलनालयाने दिल्ली, फरिदाबाद आणि परकी टपाल कार्यालयात छापे घातले. यात परकी टपाल कार्यालयामार्फत बेकायदा आयात केलेल्या 15 कोटी रुपयांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. यात 8.5 कोटी रुपयांचे 28 किलो सोने, पाच कोटी रुपयांचे स्टेरॉईड आणि देशात बंदी असलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

या वस्तू थायलंड, दुबई, तुर्कस्तान, हॉंगकॉंग आणि इंडोनेशिया येथून बेकायदा आयात करण्यात आल्या होत्या. देशात बंदी असलेल्या वस्तू परकी टपाल कार्यालयामार्फत आयात करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ही तस्करी सुरू असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. परकी टपाल कार्यालयात विदेशातून येत असलेल्या पार्सलवर खेळणी, टी-शर्ट, बेल्ट असल्याचे नोंद करण्यात आली होती. तसेच, या पार्सलवरील पत्तेही खोटे होते.

Web Title: new delhi news Smuggling through foreign post office