सुभाष बराला यांनी राजीनामा द्यावा

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी जामिनावर सुटका झालेल्या हरियाना भाजपच्या प्रदेश अध्यक्षाच्या मुलास केंद्र सरकार पाठिशी घालत आहे, असा आरोप आज काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी राजीनामा देण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

चंडीगड येथे एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी पोलिसांनी विकास बराला व त्याच्या मित्रास अटक केली होती. यावरुन आज काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले.

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ""हा प्रकार दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलिस दलावर दबाब टाकत आहे. यामुळेच संबंधितांचा जबाब तीन तासांत बदलला गेला. वास्तविक हा अपहरणाचा प्रकार असून, सहायक पोलिस अधिक्षकाने तातडीने पत्रकार परीषद घेत हा फक्त पाठलाग करण्याचा प्रकार असल्याचे घोषित केले.''

पीडित तरुणीने दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात मद्यपान केलेल्या विकास व त्याच्या मित्राने आपले अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्याविरोधात वेगळीच कलमे लावली असून, ते आता "सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नसल्याचे' म्हणत आहेत. यावरुन हेच स्पष्ट होते की, हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही सुरजेवाला यांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: new delhi news subhash barala and congress