आयोध्येतील जागेच्या देखभालीसाठी न्यायाधीशांची नावे सुचवावीत

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: आयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेच्या देखभाल व देखरेखीसाठी निरीक्षक म्हणून दहा दिवसांत दोन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांची नावे सुचविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दिले.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्या. अशोक भूषण व एस. अब्दुल नाझीर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने नियुक्त केलेल्या दोन निरीक्षकांपैकी एक जण निवृत्त झाला असून, दुसऱ्यांची उच्च न्यायालयात नियुक्ती झाल्याची माहिती अलाहाबाद उच्च न्यायालयातर्फे ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी आली. निरीक्षक म्हणून नियुक्ती करता येईल अशा न्यायाधीशांची यादीही त्यांनी सादर केली.

यावर खंडपीठाने स्पष्ट केले, की न्यायांधीशांची मोठी यादी लक्षात घेता या प्रकरणाचे महत्त्व व आधीचे निर्णय विचारात घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच नावे सुचवावीत.

या वेळी युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल म्हणाले, ""2003 मध्ये टी. एम. खान आणि एस. के. सिंग यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. गेली चौदा वर्षे ते काम करीत असताना त्यांना बदलण्याची गरज नाही. त्यामुळे त्यांनाच काम सुरू ठेवण्यास सांगावे.''

Web Title: new delhi news Suggest Judges' names for the maintenance of land in Ayodhya