दोन तलाकचे आव्हान कायम: पी. चिदंबरम

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर "तोंडी तलाक'ची प्रथा रद्दबातल झाली असली तरीसुद्धा स्त्री पुरुष समानतेसमोर आणखी दोन प्रकारच्या तलाकचे आव्हान कायम असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.

न्यायालयाच्या निकालामुळे बरीच स्पष्टता आली असली तरीसुद्धा केवळ "तोंडी तलाक' बेकायदा ठरला आहे. आणखी दोन प्रकारच्या तलाकचे आव्हान कायम असल्याचे चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मूळ कुरआनने प्रतिपादित केलेल्या तत्त्वांपेक्षा "तोंडी तलाक' ही संपूर्णपणे वेगळी बाब होती. सर्वोच्च न्यायालयाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवून योग्य पाऊल उचलले आहे असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: new delhi news talaq and p chidambaram