परराष्ट्र सचिवपदी विजय गोखले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 जानेवारी 2018

नवी दिल्ली - चीनमधील माजी राजदूत व सध्या परराष्ट्र मंत्रालयात आर्थिक संबंधविषयक विभागाची जबाबदारी सांभाळणारे सचिव विजय केशव गोखले यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांना दोन वर्षांची मुदत मिळणार आहे. वर्तमान परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे २८ जानेवारी रोजी निवृत्त होतील.

गोखले हे चीन तसेच पूर्व आशियाशी निगडित तज्ज्ञ मानले जातात. १९८१ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झालेले गोखले हे जयशंकर यांच्या खालोखाल सेवाज्येष्ठ आहेत. २०१३ ते २०१६ या काळात त्यांनी जर्मनीत राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर जानेवारी २०१६ ते ऑक्‍टोबर २०१७ या काळात त्यांची चीनमधील भारतीय राजदूत म्हणून नेमणूक झालेली होती.

ऑक्‍टोबर-२०१७ नंतर ते दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयातच आर्थिक संबंधविषयक सचिव म्हणून काम पाहत होते. गोखले यांनी जानेवारी २०१० ते ऑक्‍टोबर २०१३ या काळात मलेशियात भारतीय उच्चायुक्त म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी त्यांनी हाँगकाँग, हानोई, बीजिंग, तैपेई, न्यूयॉर्क याठिकाणीही विविध राजनैतिक जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. गोखले यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली आहे.

Web Title: new delhi news Vijay Gokhale as Foreign Secretary