वफ्तच्या संपत्तीवर अतिक्रमण; दोन हजार फौजदारी खटले दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

मुख्तार अब्बास नक्वी यांची माहिती

नवी दिल्ली: वफ्त बोर्डाच्या संपत्तीवर अतिक्रमणप्रकरणी दोन हजार फौजदारी खटले दाखल झाले असून, तीन वर्षांत बोर्डाच्या उच्चपदस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती आज केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी दिली.

केंद्रीय वफ्त बोर्डाच्या 76 व्या बैठकीत नक्वी बोलत होते. यासंदर्भातील काही तक्रारी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. काही माफियांच्या आणि वफ्त बोर्डच्या सदस्यांमध्ये गुन्हेगारी स्वरुपाचे खटले असल्यामुळे माफियांच्या हातात वफ्त बोर्डाची संपत्ती गेली आहे, असे ते म्हणाले.

माफियांच्या हातातून बोर्डाची संपत्ती परत मिळविण्याचे अभियान सुरू केल्यानंतर या संपत्तीवर झालेले अतिक्रमण उघडकीस आले आहे. अतिक्रमणातून या संपत्ती मुक्त केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार या मालमत्तांचा वापर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी वापर करणार असल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले. या संपत्तीच्या जागेवर अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रकल्प सुरू केले जात आहेत.

Web Title: new delhi news wakf board and abbas naqvi