दिल्लीत महिलेची विवस्त्र धिंड

दिल्लीत महिलेची विवस्त्र धिंड

अवैध दारूविक्रीविरोधात तक्रार केल्याने मारहाण

नवी दिल्ली: अवैध दारूविक्रीविरोधात तक्रार करणाऱ्या 33 वर्षांच्या महिलेला बेदम मारहाण करून तिची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.7) घडली. विशेष म्हणजे ही महिला दिल्ली महिला आयोगाची कार्यकर्ती व दारूमुक्तीचे काम करते. या प्रकरणी पोलिसांनी आज चार महिला आरोपींना अटक केली आहे.

दिल्लीतील नरेला भागात राहणाऱ्या संबंधित महिलेने परिसरात अवैध दारूविक्री सुरू असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने महिला आयोगाच्या पथकाने काल नरेलातील जे. जे. क्‍लस्टर येथे छापे घातले. यात एका घरातून दारूच्या 350 बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यामुळे बदल्याच्या भावनेने 25 दारूविक्रेत्यांनी संबंधित महिलेला भर रस्त्यात लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. आरोपींनी तिचे कपडेही फाडले. विवस्त्र करून तिची परिसरात धिंड काढली, असा दावा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केला. महिलेवर असे अत्याचार सुरू असताना पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत होते. आरोपींनी या घटनेचे चित्रीकरण करून ते व्हायरल केल्याचेही मालीवाल यांनी सांगितले. महिला आयोगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आज चार महिला आरोपींना अटक केली आहे.

पोलिस उपायुक्त रोहिणी रजनीश गुप्ता यांनी दोषींवर कारवाई केली नाही, असा आरोप करून दिल्ली महिला आयोगाने त्यांच्याविरोधात नोटीस काढली आहे. 21 डिसेंबरला आयोगापुढे हजर राहण्याचे समन्स त्यांना बजावले आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रुग्णालयाला भेट देऊन पीडित महिलेची चौकशी केली. यातील दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी नायब राज्यपालांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com