'जश्‍ने बचपन'मध्ये एकमेव मराठी 'राजा सिंह'

nsd
nsd

अंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड

नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित "जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात यंदा "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याची निवड झाली आहे. यासाठी आलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून केवळ एका मराठी बालनाट्याची निवड दिल्लीतील अंतिम प्रयोगासाठी करण्यात आली आहे. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांचा "एनएसडी'च्या संचालकपदाचा कार्यकाळ संपताच येथील मराठीची पीछेहाट पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू झाल्याचे हे निदर्शक मानले जाते.

"जश्‍ने बचपन' हा देशातील अतिशय प्रतिष्ठेचा बालनाट्य महोत्सव मानला जातो. यातील भारतीय बालरंगभूमीचा आविष्कार पाहण्यासाठी जगभरातील नावाजलेले रंगकर्मी येत असतात. यंदाच्या महोत्सवासाठी किमान 221 बालनाट्यांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून निवडक सुमारे 24-25 नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली. त्यात "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याला स्थान मिळाले आहे. अंतिम फेरीतील नाटकांत 21 भारतीय व तीन विदेशी नाटकांची निवड करण्यात आली आहे. मराठीतून 40 प्रवेशिका दिल्लीला आल्या होत्या. त्यातील केवळ एकाची (राजा सिंह) निवड झाली आहे. येत्या शनिवारी (ता.24) सायंकाळी साडेपाचला कोपर्निकस मार्गावरील एलटीजी नाट्यगृहाच्या रंगमंचावर "राजा सिंह'चा प्रयोग होईल.

बालरंगभूमीला अतिशय सशक्त परंपरा असल्याचे वर्षभरापूर्वी सांगणारे "एनएसडी'च्या बाल विभागाचे प्रमुख खटाना यांच्या नेतृत्वाखालील समितीला यंदा या सशक्त परंपरेतील केवळ एकच नाटक दिसावे हे सूचक मानले जाते. पहिले थिएटर ऑलिंपिक्‍स भरविण्याचा भारताला मान मिळवून देणारे वामन केंद्रे "एनएसडी'च्या रंगमंचावरून अंतर्धान पावताच येथील पाच वर्षे दाबून ठेवलेला मराठीद्वेष यानिमित्ताने पुन्हा उफाळल्याचे मानले जाते.
---
रत्नागिरीतील निर्मिती
रत्नागिरीच्या "अहन क्रिएशन्स'ची निर्मिती असलेल्या व बहुतांश बालकलाकारांचा सहभाग असलेल्या "राजा सिंह'मध्ये 40 कलाकार आहेत. विवेक साठे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक केतन क्षीरसागर आहेत. सिद्धेश दळवी हे नृत्यदिग्दर्शक तर मयूरेश माडगावकर संगीतकार आहेत. संगीत-नृत्य व नाट्याच्या त्रिवेणी संगमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या "राजा सिंह'ने यापूर्वीच नाट्यकर्मींची दाद मिळविली आहे. मानवाच्याच स्वभावाची रूपे असलेली दोन मुख्य पात्रे व मानवातील पशूला पराभूत करण्यासाठी जंगलातील पशू-पक्ष्यांची झालेली एकजूट याद्वारे दाखविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com