विमानातील गोंधळ थांबविण्यासाठी नवी नियमावली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

खासदार रवींद्र गायकवाड आणि एअर इंडियामध्ये झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानातील आणि विमान प्रवासासंदर्भातील गोंधळ दूर व्हावा यासाठी नवी नियमावली सादर केली आहे. या नव्या नियमाच्या मसुद्याबाबत विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांनी माहिती दिली.

नवी दिल्ली : खासदार रवींद्र गायकवाड आणि एअर इंडियामध्ये झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमानातील आणि विमान प्रवासासंदर्भातील गोंधळ दूर व्हावा यासाठी नवी नियमावली सादर केली आहे. या नव्या नियमाच्या मसुद्याबाबत विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांनी माहिती दिली.

नव्या नियमाच्या मसुद्यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे -

  1. हवाई वाहतूक कंपनी एखाद्या प्रवाशाला एखाद्या विमान प्रवासापासून तातडीने रोखू शकते. मात्र, संबंधित प्रवासी तातडीने राष्ट्रीय विमान प्रवास बंदी असणाऱ्या प्रवाशांच्या यादीत येऊ शकत नाही.
  2. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या प्रवाशाला देशातील हवाई प्रवासाला बंदी लागू करता येईल. संबंधित प्रवाशाबाबतच्या बंदीची माहिती आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या वापर करू शकतील.
  3. नियमबाह्य वर्तन करणाऱ्या प्रवाशांचे शिक्षेच्या अनुषंगाने तीन गटात वर्गीकरण करता येईल. पहिल्या गटात 3 महिन्यांपर्यंत, दुसऱ्या गटात सहा महिन्यांपर्यंत आणि तिसऱ्या गटात दोन वर्षांपर्यंत बंदी लागू करता येईल.
  4. पहिल्या गटात अडथळा निर्माण करणारे प्रवासी, दुसऱ्या गटात लाथ मारणे, लैंगिक छळ अशा शारीरिक इजा पोहोचविणारे प्रवासी आणि तिसऱ्या गटात जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे प्रवाशांचा समावेश असेल.
Web Title: new draft rules for air travel