नवे शैक्षणिक धोरण हे भारताला नवी दिशा देणारे : PM मोदी

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 11 September 2020

व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत 21 व्या शतकातील शालेय शिक्षण या विषयावरील एका संमेलनात मोदी सहभागी झाले होते.

नवी दिल्ली  : नवे शैक्षणिक धोरण 21 व्या शतकातील भारताला नवी दिशा देणारे ठरेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत 21 व्या शतकातील शालेय शिक्षण या विषयावरील एका संमेलनात ते सहभागी झाले होते. या संमेलनात शिक्षणमंत्री रमेश पोखरियालदेखील उपस्थित होते.

 परीक्षा घेताना घ्या काळजी; आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

काय म्हणाले मोदी?
नवे शैक्षणिक धोरण हे नव्या भारताच्या नव्या अपेक्षांना, नव्या आवश्यकतांना पुर्ण करण्याचे माध्यम आहे. याच्यामागे चार-पाच वर्षांची प्रचंड मेहनत आहे. प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक भाषेतील लोकांनी यावर रात्रंदिवस काम केलेले आहे. अजून हे काम बाकी आहे. 

काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षकांकडून आपल्या सुचना मागवल्या होत्या. एका आठवड्याच्या आतच 15 लाखांहून अधिक सुचना प्राप्त झाल्या. या सर्व सूचना शैक्षणिक धोरणाला आणखी प्रभावी पद्धतीने प्रत्यक्षात लागू करण्यास मदत करतील. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कौशल्याला महत्व
मोदी म्हणाले की, आपल्या देशात प्रत्येक राज्याचे स्वत:चे एक वेगळेपण आहे. प्रत्येक ठिकाणची कोणती ना कोणती पारंपारिक कला, कारागिरी, नवनिर्मिती प्रसिद्ध आहे. विद्यार्थ्यांनी अशाजागी जरुर भेट द्यावी. यामुळे त्यांची जिज्ञासाही वाढेल आणि त्यांच्या माहीतीतही भर पडेल. 

आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्यासह समृद्ध बनवायचे आहे. क्रिटिकल थिंकींग, क्रिएटीव्हीटी, कोलॅबोरेशन, क्यूरॅसिटी आणि कम्यूनिकेशन ही 21 व्या शतकातील कौशल्ये आहेत. 

भाषा हे निव्वळ माध्यम
मोदी म्हणाले की, आपल्याला ही शास्त्रीय गोष्ट समजून घेतली पाहिजे की, भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे. भाषा म्हणजे सर्व शिक्षण नव्हे. ज्याही भाषेत मुले सोप्या पद्धतीने शिकू शकतील त्या भाषेचाच अभ्यास झाला पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Education Policy Will Give New Direction To India Said Modi