माल्डामध्ये दोन हजारच्या 100 बनावट नोटा जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

बांगलादेश सीमा तस्करीचे केंद्र
भारत-बांगलादेश सीमा बनावट नोटा तस्करीचे केंद्र आधीपासून राहिले आहे. गेल्या वर्षभरात सीमेवर 1.47 कोटी रुपयांची बनावट नोटांची तस्करी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली आहे.

कोलकता : सीमा सुरक्षा दलाने दोन हजार रुपयांच्या शंभर बनावट नोटा पश्‍चिम बंगालमधील माल्डा जिल्ह्यात जप्त केल्या आहेत. भारत-बांगलादेश सीमेवर नोटाबंदीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार, चुरियांतपूर भागात सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी भारताच्या बाजूने काही तस्कर बांगलादेशच्या सीमेपलिकडून संशयास्पद वस्तूंची देवाणघेवाण करताना दिसून आले. जवानांनी त्यांना रोखले असता ते एक पॅकेट तेथेच टाकून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. 

जवानांना घटनास्थळी सापडलेल्या पॅकेटमध्ये दोन हजार रुपयांच्या शंभर बनावट नोटा आढळल्या. सरकारने पाचशे व हजारच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. दरम्यान, सीमा सुरक्षा दल आणि राष्ट्रीय तपास संस्थेने संयुक्त कारवाईत माल्डा येथे नुकतीच गोपालगंज परिसरात उमर फारुक ऊर्फ फिरोज याला अटक करून त्याच्याकडून दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

बांगलादेश सीमा तस्करीचे केंद्र
भारत-बांगलादेश सीमा बनावट नोटा तस्करीचे केंद्र आधीपासून राहिले आहे. गेल्या वर्षभरात सीमेवर 1.47 कोटी रुपयांची बनावट नोटांची तस्करी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली आहे.
 

Web Title: new fake currency notes worth 1.34 crore seized in malda