मोदींच्या जीवाला धोका ; मंत्रीही भेटू शकणार नाहीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत नव्या मार्गदर्शक सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटाबाबत माहिती समोर आली होती. त्यानुसार नवी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विशेष सुरक्षा गटाकडून (एसपीजी) परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही मंत्री किंवा अधिकाऱ्याला पंतप्रधान मोदींच्या जवळही जाता येणार नाही. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात सांगण्यात आले, की पंतप्रधान मोदींवर अज्ञातांकडून हल्ला होण्याची शक्यता आहे. या सर्वाची खबरदारी घेता अधिकाऱ्यांसह मंत्र्यांनाही एसपीजीच्या परवानगीशिवाय मोदींच्या जवळ किंवा त्यांची भेटही घेता येणार नाही. तसेच 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोदींनी रोड शो कमी करावेत आणि त्याऐवजी फक्त जाहीर सभांवर लक्ष द्यावे, असेही एसपीजीकडून सुचविण्यात आले. 

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या जीवाला सर्वाधिक धोका असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी ते सर्वाधिक निशाण्यावर आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या 'क्लोज प्रोटेक्शन टीम'लाही (सीपीटी) या मार्गदर्शक तत्वांची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आवश्यक असल्यास मंत्री आणि अधिकाऱ्यांचीही तपासणी करण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: New guidelines for PMs security Ministers officers wont be allowed to come close

टॅग्स