...ही तर 'पे टू मोदी' स्कीम - राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

प्राप्तीकर दुरुस्ती विधेयकामुळे काळा पैसा धारकांना फायदाच होणार आहे. काळा पैसा धारकांना काळा पैसा घोषित करून 50 टक्के रक्कम पांढरी करण्याची संधी सरकार देत आहे.

नवी दिल्ली - अघोषित संपत्ती लपविणाऱ्यांसाठी लोकसभेत मंजूर करण्यात आलेले प्राप्तीकर कायदा दुरुस्ती विधेयक म्हणजे नवी पीटीएम (पे टू मोदी) स्कीम असल्याची, टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर जाहीर केलेल्या बेहिशेबी संपत्तीवर पन्नास टक्के अधिभार आणि जाहीर न करता सापडणाऱ्या पैशावर 85 टक्‍क्‍यांपर्यंत दंड लावण्याची तरतूद असलेले प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही चर्चेशिवाय हे विधेयक मंजूर करण्यात आल्याने विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यात आला. राहुल गांधी यांनीही भाजपवर या प्रकरणी टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी म्हणाले, की या प्राप्तीकर दुरुस्ती विधेयकामुळे काळा पैसा धारकांना फायदाच होणार आहे. काळा पैसा धारकांना काळा पैसा घोषित करून 50 टक्के रक्कम पांढरी करण्याची संधी सरकार देत आहे.

Web Title: The new Income Tax Amendment Bill is akin to a new 'PTM' or 'Pay to Modi' scheme, says rahul gandhi