एक नवा भारत घडत आहे : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 12 मार्च 2017

'एक नवा भारत घडत आहे. ज्या भारतात 125 कोटी भारतीयांची क्षमता आणि कौशल्यावर शक्ती आहे. हा भारत विकासासाठी उभा आहे. 2022 साली ज्यावेळी आपण ज्यावेळी भारताचे 75 वे वर्ष साजरे करू त्यावेळी आपण महात्मा गांधी, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिमान वाटेल असा भारत बनविलेला असेल.'

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व ऐतिहासिक विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्साहित झाले आहेत. "एक नवा भारत घडत आहे. हा भारत विकासासाठी उभा आहे', अशा शब्दांत त्यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मोदी यांनी ट्विटरद्वारे लिहिले आहे की, "एक नवा भारत घडत आहे. ज्या भारतात 125 कोटी भारतीयांची क्षमता आणि कौशल्यावर शक्ती आहे. हा भारत विकासासाठी उभा आहे. 2022 साली ज्यावेळी आपण ज्यावेळी भारताचे 75 वे वर्ष साजरे करू त्यावेळी आपण महात्मा गांधी, सरदार पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिमान वाटेल असा भारत बनविलेला असेल.'

आज राजधानी दिल्लीत उत्तर प्रदेशमधील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विजय साजरा करण्यात येत आहे. आज संध्याकाळी दिल्लीतील ली मेरिडियन हॉटेलपासून भाजपच्या मुख्यालयात पायी जात मोदी "रोड शो' करणार आहेत. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना मोदी भेटणार आहेत. त्यानंतर मुख्यालयात मोदींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

Web Title: A new India is emerging : Narendra Modi