'न्यू इंडिया'त प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (VIP) वाहनावरील लाल दिवा हटविण्याच्या निर्णयाबाबत बोलताना नरेंद्र मोदी यांनी 'न्यू इंडिया' हा VIP चा नसून EPI (Every Person is important) चा असल्याचे सांगत देशातील प्रत्येक नागरिक महत्वाचा असल्याचे प्रतिपादन 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना केले.

नवी दिल्ली : अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (VIP) वाहनावरील लाल दिवा हटविण्याच्या निर्णयाबाबत बोलताना नरेंद्र मोदी यांनी 'न्यू इंडिया' हा VIP चा नसून EPI (Every Person is important) चा असल्याचे सांगत देशातील प्रत्येक नागरिक महत्वाचा असल्याचे प्रतिपादन 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना केले.

'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाच्या 31 व्या भागात मोदी बोलत होते. ते म्हणाले, 'आपल्या देशातील नागरिकांना VIP संस्कृती आवडत नाही. ही भावना किती तीव्र आहे हे मला अलिकडच्या काळात समजले. त्यामुळेच सरकारने कितीही महत्वाचा नेता असला तरीही त्याच्या गाडीवर लाल दिवा लावण्यास बंदी आणली.' 'मन की बात' या कार्यक्रमाला देशभरातील अनेक ठिकाणांवरून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मोदी यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीला सांगितले. महाराष्ट्र आणि गुजरातच्या स्थापनादिनानिमित्त मोदी यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

'मन की बात' कार्यक्रमात मोदी यांनी मांडलेले मुख्य मुद्दे -

  • सुट्यामध्ये तीन गोष्टी करण्याचा सल्ला देतो. नव्या ठिकाणांना भेट द्या. नवे अनुभव घ्या. नवे कौशल्य आत्मसात करा.
  • नवे कौशल्य वापरून परिघाच्या बाहेर नेणारे नवे प्रयोग करा.
  • कधी कधी आपण इतके व्यग्र असतो की उन्हामध्ये घरात दूध पोचवणारा, वृत्तपत्र पोचवणारा, भाजी देणारा किंवा पोस्टमनला पाणी विचारण्याचेही विसरतो.
  • तंत्रज्ञान बाजूला ठेवून स्वत:साठी काही वेळ खर्च करण्याचा प्रयत्न करा : नरेंद्र मोदी
  • आयुष्यात वेगळे अनुभव घ्या. कधीतरी द्वितीय श्रेणीच्या रेल्वेच्या तिकिटाने प्रवास करून गर्दीचा अनुभव घ्या. कधी गरीब मुलांच्या वस्तीत जाऊन खेळण्याचा आनंद घ्या.
  • जागतिक तापमानवाढ हा पूर्वी शैक्षणिक अभ्यासाचा विषय होता. तो आता दैनंदिन अनुभवाचा विषय झाला आहे.
Web Title: New india is not about VIP but EPI : Narendra Modi