नवीन महाराष्ट्र सदन पुन्हा ‘सील’

नवीन महाराष्ट्र सदन पुन्हा ‘सील’

नवी दिल्ली - कोरोना लॉकडाउननंतर हळूहळू पूर्वपदावर येणाऱ्या दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाच्या व्यवहारांना पुन्हा जोरदार ब्रेक लागला आहे. सदनातील तसेच उपाहारगृहातील कायम व कंत्राटी अशा किमान १७ ते २० कर्मचाऱ्यांना साधारणतः एकच वेळी कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्याने हबकलेल्या प्रशासनाकडून संपूर्ण महाराष्ट्र सदन पुन्हा ‘सील’ करण्यात आले आहे. 

दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे दिल्ली सरकारनेही पाच ऑक्‍टोबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय आज घेतला. संसद अधिवेशन चालू असल्याने सध्या राज्यातील अनेक खासदार व त्यांचे साहाय्यक नवीन महाराष्ट्र सदनात मुक्कामी आहेत. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची निवास व्यवस्था जुन्याच सदनात करण्यात आली आहे. २०१९ मध्ये नव्याने निवडून आलेल्या राज्यातील काही खासदारांना सरकारने निवासस्थाने दिली असली तरी हेमंत पाटील, ओमराजे निंबाळकर, आदी अनेक खासदारांना अद्याप निवासस्थाने मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांचा मुक्काम सदनातच आहे. मात्र कोरोनाचा ताजा उद्रेक झाल्यावर अनेक खासदारांना लोकसभा सचिवालयाने वेस्टर्न कोर्ट येथे तातडीने हलविले आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सूत्रांच्या माहितीनुसार सदनाच्या प्रशासनाने दाखविलेल्या बेफिकिरीचा फटका बसल्याचे चित्र आहे. येथील एका निवृत्त कर्मचाऱ्याच्याच मुलाला व नंतर कटुंबातील अन्य दोघांना आधी कोरोना झाला व नंतर ही साथ झपाट्याने परिसरात पसरली अशी माहिती मिळते. निवृत्त झाल्यानंतरही या ना त्या नियमाखाली सदनाच्या व्यवस्थापनाने त्याला सेवेत ठेवल्याची माहिती आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारच्या आदेशानुसार वर्ग २ व त्यावरील अधिकारी वगळता इतर कर्मचाऱ्यांपैकी आधी १५ टक्के व नंतर ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावणे आवश्‍यक होते. प्रत्यक्षात प्रशासनाने १०० टक्के कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याची सक्ती केली. या साऱ्याचा गंभीर परिणाम म्हणजे कोरोनाचा एकदम उद्रेक झाला व १७ कोरोनाग्रस्त आढळल्याने सारेच्या सारे महाराष्ट्र सदन पुन्हा सील करावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com