आता 20 आणि 50 रुपयांच्या नव्या नोटा

वृत्तसंस्था
रविवार, 4 डिसेंबर 2016

मुंबई: पाचशे व दोन हजारांची नवी नोट चलनात आणल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेने वीस व पन्नास रुपयांच्या नव्या नोटा छापण्याची घोषणा केली आहे.

वीस रुपयाच्या नव्या नोटेवर विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेलांच्या सहीसोबत दोन्ही नंबर पॅनलवर इंग्रजीत 'एल' अक्षर छापले जाणार आहे. दोन्ही नंबर पॅनलवर इन्सेट लेटरशिवाय पन्नास रुपयांच्या नोटा छापल्या जाणार आहेत.  

या मूल्याच्या जुना नोटादेखील वापरात राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. या नव्या नोटा 2005 श्रेणीतील असतील व यावर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची सही असेल. या नोटेवर '2016' चे प्रिंट असेल. 
 
Web Title: new notes of 20 and 50 rupees soon