दिल्ली-मुंबई मार्गावर नवी राजधानी एक्‍स्प्रेस

दिल्ली-मुंबई मार्गावर नवी राजधानी एक्‍स्प्रेस

नवी दिल्ली : नवी दिल्ली- मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक खूशखबर. रेल्वे या मार्गावर आणखी एक राजधानी एक्‍स्प्रेस लवकरच सुरू करणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण- नाशिक- खांडवा या मार्गाने ती नवी दिल्लीला जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी सांगितले.

मध्य रेल्वेच्या मार्गाने धावणारी ही पहिली राजधानी एक्‍स्प्रेस असेल. सध्या नवी दिल्ली- मुंबईदरम्यान दोन राजधानी एक्‍स्प्रेस पश्‍चिम रेल्वेच्या मार्गावरून धावतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार ही नवी गाडी सुरू केली जाणार असल्याचे गोयल यांनी नमूद केले. या नव्या गाडीमुळे रेल्वेकडील राजधानी एक्‍स्प्रेसची संख्या 23 वर पोहोचेल, असेही ते म्हणाले. 

असा असेल मार्ग 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण- नाशिक- जळगाव- खांडवा- भोपाळ- झाशी- आग्रा- हजरत निजामुद्दीन. 

उपलब्ध आसने समजणार 

विमान सेवेप्रमाणेच लवकरच रेल्वे प्रवाशांनाही एखाद्या विशिष्ट गाडीतील उपलब्ध आसनांची माहिती मिळणार आहे. रेल्वे माहिती केंद्र सेवेमार्फत (सीआरआयएस) आरक्षणाची स्थिती उपलब्ध करून देण्याची सूचना गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

सध्या विमान सेवेचे आरक्षण करताना संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर आसनव्यवस्थेचा आराखडा येतो आणि आरक्षित आसने वेगळ्या रंगांत दाखविली जातात, त्यामुळे किती आसने उपलब्ध आहेत, हे प्रवाशांना समजते. मात्र, विमान सेवेप्रमाणे आसन निवडण्याची सुविधा नंतर दिली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com