गोव्यात नवजात शिशू चिकित्सा केंद्रे सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

राज्यात जन्मणारी पिढी भविष्यातही आरोग्याच्या दृष्टीने सबल व्हावी म्हणून राज्यात नवजात शिशू चिकित्सा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

पणजी - बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीराची तपासणी केली तर आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती पाउले उचलता येतात. याच दृष्टिकोनातून राज्यात जन्मणारी पिढी भविष्यातही आरोग्याच्या दृष्टीने सबल व्हावी म्हणून राज्यात नवजात शिशू चिकित्सा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यात ही सेवा उपलब्ध करण्यात आली असून ज्या बालकांचा जन्म खासगी रुग्णालयात होतो, त्यांचे पालकही जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन ही चाचणी करू शकत असल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले. 

2008 साली देशात सर्वप्रथम ही सेवा चालू करणारे गोवा हे पहिले राज्य होते, कालांतराने काही कारणास्तव ही सेवा बंद पडली होती. पण दरम्यानच्या काळात भारत सरकारने ही सेवा चालू करण्याचा निर्णय घेतल्याने आता या केंद्रांसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळत असल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नुकत्याच जन्मलेल्या बाळाची तपासणी करून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. बाळ जन्माला आल्यानंतर बहात्तर तासांच्या आत ही तपासणी करावी लागत असल्याची माहिती यावेळी डॉ. प्रदीप नाईक यांनी दिली.  

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newborn Shishu Medical Centers started in Goa