BJP Leader: नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या भाजप नेत्याला अटक

Assam BJP Leader
Assam BJP Leaderesakal

Assam BJP Leader: आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका महिला नेत्याला फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आसाममधील कार्बी ओन्ग्लॉंग जिल्ह्यातील या महिला नेत्याने लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुमारे ९.५२ कोटी रुपये उकळले. अटकेनंतर भाजपने या महिले नेत्याची पक्षातून हकलपट्टी केली आहे.

भाजपच्या किसान मोर्चा शाखेच्या नेत्या 'मून इंगटिपी' यांना गुरुवारी अटक करण्यात आली. तिच्या विरोधात पोलिसात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. अधिकृत तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Assam BJP Leader
Gautami Patil: "संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील"

पुराव्याच्या आधारे अटक

कार्बी आंगलाँग जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयन बर्मन म्हणाले की, आम्हाला अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांचे पथक या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आसाममधील विविध सरकारी खात्यांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली इंगाटीपीने काही लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले, मात्र पैसे देवून देखील नोकरी लागत नसल्याने काही लोकांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर हे प्रकरण समोर आले. इंगाटीपीवर अनेक लोकांकडून सुमारे 9.52 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.

Assam BJP Leader
Eknath Shinde: ...ते खरं ठरलं! शिवसेनेत दोन गट; बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट

या महिलेकडून फसवणूक झालेल्या काही लोकांनी सांगितले की, इंगाटीपीने पैसे गोळा करण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाचा वापर केला होता.

कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य (सीईएम) तुलीराम रोंगांग हे त्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या अटकेनंतर भाजपच्या आसाम युनिटने त्यांना किसान मोर्चातील पदावरून काढून टाकले आणि पक्ष सोडण्यास सांगितले. मात्र, मून इंगाटीपी यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांच्या अटकेबाबत भाजप नेतृत्वाने मौन बाळगले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com