अनेक क्षेत्रांत न्यूझीलंड भागीदार बनू शकतो : मुखर्जी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - सुरक्षा, स्थैर्य, अन्नसुरक्षा; तसेच संपन्नतेमध्ये न्यूझीलंड भागीदार बनू शकतो, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. सध्या भारत भेटीवर असलेले न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांचे त्यांनी राष्ट्रपती भवनात स्वागत केले व चर्चा केली.

जॉन की आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना मुखर्जी म्हणाले, ""न्यूझीलंडशी सौहार्द वाढविण्यास भारत उत्सुक आहे. या दोन्ही लोकशाही देशांतील संबंध कायमच दृढ राहतील. भारताच्या अन्नसुरक्षेमध्ये न्यूझीलंड हा महत्त्वाचा भागीदार बनू शकतो. गेल्या आठ वर्षांत दोन्ही देशांतील व्यापार दुपटीने वाढला आहे.'' दरम्यान, जॉन की आणि त्यांच्या पत्नी ब्रोनाग की यांनी आज येथील जामा मशीद आणि सिस गंज गुरुद्वाराला भेट दिली.

Web Title: Newzeland will be partner in many sectore : Mukharjee