गोव्यात पुढील वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

पणजी : गोव्यात पुढील वर्षी 30 मार्च ते 14 एप्रिलदरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल, अशी घोषणा क्रीडामंत्री मनोहर आजगावकर यांनी विधानसभेत केली. 32 क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात येणार असून 34 क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्याचा प्रयत्न असेल. 2019 हे वर्ष त्यासाठी सुवर्णाक्षरांनी नोंदवण्यासारखे वर्ष असेल असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले, गेल्या वर्षी गोव्याच्या क्रीडापटूंनी 385 पदके विविध स्पर्धांमध्ये जिंकली. ते खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांचे सरकार अभिनंदन करत आहे. खेलो इंडियांतर्गत दोघांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा विकसित करणे सुरु केले आहे. रात्रंदिन ते काम करावे लागणार आहे. या स्पर्धेत पदक मिळविणाऱ्यांना बक्षीस व सोयी सुविधा दिल्या जातील. क्रीडा गुण दीड लाख विद्यार्थी मिळवतात तर क्रीडागुणांच्या मदतीने 350 उत्तीर्ण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील खेळाडूंना अनुक्रमे आठ हजार रुपये, पाच हजार रुपये व तीन हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येते. आयलीगच्या संदर्भात चर्चिल यांनी चांगले काम केल्याने तीन कोटी रुपयांची मदत त्यांना आता केली आहे.सरकार याकांमी त्यांच्यासोबत आहे. स्टेडीयमची देखभाल करणे कठीण काम असते म्हणून स्टेडियम भाडेपट्टीवर देण्याचा विचार आहे.

कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल म्हणाले, यंदा स्क्वे मार्शल आर्टमध्ये अनेक पदके राज्याला मिळाली आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यास सरकारचे प्रयत्न हवेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील एकाही. क्रीडा प्रकाराचे आयोजन राज्याबाहेर नको.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: next year national games will be in goa